Team India च्या वेळापत्रकात BCCI ने केला मोठा बदल, वाचा…

Team India च्या वेळापत्रकात BCCI ने केला मोठा बदल, वाचा…

टीम इंडियाच यावर्षीच वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. 20 जून पासून टीम इंडियाचा इंग्लंड दौरा सुरू होणार असून टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका हे संघ सुद्धा हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार आहे. ऑक्टेबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे तीन महिने क्रीडा प्रेमींना कसोटी, वनडे आणि टी-20 मालिकेचा थरार पाहायला मिळणार आहे.

ऑक्टोबरमध्ये टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 2 ऑक्टोबरपासून अहमदाबादमध्ये सुरू होणार आहे. तर दुसरा सामना 10 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. जुन्या वेळापत्रकानुसार दुसरा कसोटी सामना कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर होणार होता. मात्र आता हा सामना नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना जुन्या वेळापत्रकानुसार 14 नोव्हेंबरपासून नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार होता. परंतु हा सामना आता कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. या दोन बदलांव्यतिरिक्त इतर वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

वेस्टइंडिजचा हिंदुस्थान दोरा

1) पहिली कसोटी – 2 ते 6 ऑक्टोबर (नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद)
2) दुसरी कसोटी – 10 ते 14 ऑक्टोबर (अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली)

दक्षिण आफ्रिकेचा हिंदुस्थान दौरा

पहिली कसोटी – 14 ते 18 नोव्हेंबर, कोलकाता
दुसरी कसोटी – 22 ते 26 नोव्हेंब, गुवाहाटी

पहिली वनडे – 30 नोव्हेंबर, रांची
दुसरी वनडे – 3 डिसेंबर, रायपूर
तीसरी वनडे – 6 डिसेंबर, विशाखापट्टनम

पहिली टी-20 – 9 डिसेंबर, कटक
दुसरी टी-20 – 11 डिसेंबर, मुल्लांपूर
तिसरी टी-20 – 14 डिसेंबर, धर्मशाळा
चौथी टी-20 – 17 डिसेंबर, लखनऊ
पाचवी टी-20 – 19 डिसेंबर, अहमदाबाद

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;