Russia Attack Ukraine : रशियाने युक्रेनवर केला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; 479 ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे डागली

Russia Attack Ukraine : रशियाने युक्रेनवर केला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; 479 ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे डागली

रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला असून, रविवारी रात्री तब्बल 479 ड्रोन्स आणि 20 क्षेपणास्त्रे डागली आहे. युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 460 ड्रोन्स आणि 19 क्षेपणास्त्रे यशस्वीपणे नष्ट करण्यात आली. या हल्ल्यामुळे युक्रेनच्या अनेक भागांत नुकसान झाले असले, तरी कोणत्याही मोठ्या जीवितहानीची नोंद झालेली नाही.

युक्रेनच्या रिव्हने शहराचे महापौर ऑलेक्झांडर ट्रेत्याक यांनी या हल्ल्याला युद्ध सुरू झाल्यापासून रिव्हने प्रांतावरील सर्वात मोठा हल्ला असल्याचे म्हटले आहे. रशियाने गेल्या काही आठवड्यांपासून युक्रेनवरील हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे, ज्यामुळे रशियाला शांतता चर्चेत रस नसल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे.

दरम्यान, याआधी युक्रेनने रशियन लष्कराच्या चार हवाई तळांवर ड्रोन हल्ले केले होते. हे हल्ले इतके जबरदस्त आणि अचूक होते की त्यात रशियाच्या अणुबॉम्बचा मारा करणाऱ्या तसेच हेरगिरी करणाऱ्या 41 विमानांच्या क्षणार्धात चिंधड्या उडाल्या, असा दावा करण्यात आला होता. ‘ऑपरेशन स्पायडरवेब’ असे नाव या कारवाईला देण्यात आले होते. 4700 किलोमीटर आत घुसून हे हल्ले करण्यात आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;