मुंब्रा रेल्वे अपघातात बुलढाण्यातील जवानाचा मृत्यू

मुंब्रा रेल्वे अपघातात बुलढाण्यातील जवानाचा मृत्यू

मुंबई येथे लोकल ट्रेनमधून पडून झालेल्या अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील जुमडा गावचे रहिवासी आणि जीआरपीमधील जवान विकी बाबासाहेब मुख्यदल (33) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच जुमडा गावावर शोककळा पसरली.

आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास विकी मुख्यदल हे कर्तव्यावर जात असताना मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे असताना, समोरून आलेल्या दुसर्‍या लोकल ट्रेनमधील प्रवाशांशी झालेल्या धडकेत त्यांचा तोल जाऊन ते ट्रेनमधून खाली पडले. विकी मुख्यदल हे ठाणे जीआरपी विभागात कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच जुमडा गावात शोककळा पसरली असून कुटुंबियांसह संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ आणि एक मुलगा असा परिवार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;