French Fries Making Tips- घरी फ्रेंच फ्राईज करताना कुरकुरीत बनत नाहीत, मग या टिप्स वापरा
बटाटा हा आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक. बटाट्याशिवाय आपण आहाराची कल्पनाही करु शकत नाही. बटाट्याची भाजी, बटाट्याची कापं, बटाटे वडे असे सर्व पदार्थ आपण आवडीने खातो. परंतु या सर्वांव्यतिरिक्त फ्रेंच फ्राईज (Friench Fries) हा सर्वांचाच आवडीचा स्नॅक्स. परंतु घरी फ्रेंच फ्राईज करताना मात्र अनेकदा फसतात. फ्रेंच फ्राईज नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते आणि सर्वजण ते खूप आवडीने खातात. फ्राईज फक्त चांगल्या रेस्टॉरंटमध्ये किंवा फास्ट फूड आउटलेटमध्येच उपलब्ध असतात. आपण घरी हे फ्रेंच फ्राईज बनवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अनेकदा ते फसतात, म्हणूनच परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी काय करायला हवं हे आपण बघुया.
परफेक्ट फ्रेंच फ्राईज बनविण्याच्या टिप्स
मोठे पांढरे बटाटे वापरा
आजकाल बाजारात अनेक प्रकारचे बटाटे उपलब्ध आहेत. परंतु या प्रत्येक बटाट्यांपासून फ्राईज करणे उपयुक्त नाही. फ्राईज करण्यासाठी, चिप्ससाठी वापरल्या जाणाऱ्या बटाट्यांसारखे स्टार्चयुक्त बटाटे निवडा. तुम्ही मोठे पांढरे बटाटे निवडू शकता कारण ते लवकर शिजतात आणि तळल्यावरही कुरकुरीत राहतात.
बटाटे कापून पाण्यात भिजवा
बटाटे कापल्यानंतर ते थेट तेलात टाकू नका. प्रथम, त्यांना किमान 30 मिनिटे थंड पाण्यात भिजवा. यामुळे त्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जाईल आणि बटाटे तळताना एकमेकांना चिकटणार नाहीत. तुमच्याकडे वेळ असेल तर पाण्यात थोडा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घाला.
पूर्णपणे कोरडे करा
बटाटे पाण्यातून काढल्यानंतर ते वाळवणे खूप महत्वाचे आहे. बटाटे वाळवल्याशिवाय तेलात टाकले तर, ते मऊ पडण्याचा धोका असतो. तसेच तेल अंगावर उडण्याची भीती असते. म्हणून प्रथम बटाटे चांगले वाळवा आणि नंतर ते तळण्यासाठी वापरा. बटाटे कोरडे करण्यासाठी स्वयंपाकघरातील टॉवेल वापरू शकता.
तांदळाचे पीठ वापरा
कुरकुरीत फ्राईज बनवण्यासाठी तुम्ही तांदळाचे पीठ वापरू शकता. तांदळाच्या पिठामध्ये कमी ओलावा असतो आणि तळल्यावर त्याचा थर पातळ होतो, यामुळे फ्राईज जास्त कुरकुरीत होतात.
संबंधित बातम्या :
स्वयंपाक रुचकर, चविष्ट आणि पौष्टिक करायचाय? मग या टिप्स वापराच
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List