पाकिस्तानची परिस्थिती आणखीनच बिकट, कर्जाचा डोंगर पोहोचला सर्वोच्च स्थानावर

पाकिस्तानची परिस्थिती आणखीनच बिकट, कर्जाचा डोंगर पोहोचला सर्वोच्च स्थानावर

पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आणखीन बिकट होत चालली आहे. पाकिस्तानवरचा कर्जाचा डोंगर वाढत चालला असून नुकत्याच प्रसिद्ध झालेलल्या एका आर्थिक अहवालानुसार पाकिस्तानवरील सार्वजनिक कर्ज 76 हजार अब्ज पाकिस्तानी रुपये (76 ट्रिलियन) पर्यंत पोहोचले आहे. हा आतापर्यंतचा कर्जाचा सर्वात मोठा आकडा असल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तान हा गेल्या चार वर्षात सर्वाधिक कर्जबाजारी झाला आहे. 2020 पासून पाकिस्तानचे कर्ज हे दुपटीने वाढले आहे. तर दहा वर्षात हा आकडा पाच पटीने वाढला आहे. 2020-21 मध्ये कर्जाचा आकडा हा 39 हजार अब्ज होता. आता तो आकडा 76 हजार अब्ज झाला आहे.

ऑपरेश सिंदूरच्या वेळी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला एक अब्ज डॉलरचे कर्ज दिले. परंतु त्यानंतर ‘आयएमएफ’ने पाकिस्तानला जोरदार दणका देत 11 नव्या अटी लादल्या होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;