कोचीजवळ सिंगापूरच्या मालवाहू जहाजाला आग; 4 क्रू मेंबर्स बेपत्ता, 5 जण जखमी

कोचीजवळ सिंगापूरच्या मालवाहू जहाजाला आग; 4 क्रू मेंबर्स बेपत्ता, 5 जण जखमी

केरळमधील कोचीच्या किनाऱ्याजवळ सिंगापूरच्या मालवाहू जहाजाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत चार क्रू मेंबर्स बेपत्ता असून पाच जण जखमी झाले आहेत. कोलंबोहून न्हावा शेवा येथे माल वाहून नेणाऱ्या 270 मीटर लांबीच्या MV WAN HAI 503 या जहाजाच्या डेकखाली आग लागल्याची माहिती मिळते. जहाजात क्रू मेंबर्ससह 22 जण होते. हिंदुस्थानी तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10.30 च्या सुमारास ही घटना घडली.

जहाजात आग लागताच मुंबईतील मेरीटाईम ऑपरेशन्स सेंटरला प्रथम अलर्ट मिळाला. त्यांनी ही माहिती त्यांच्या कोची युनिटला दिली. यानंतर न्यू मंगलोरहून राजदूत, कोचीहून अर्णवेश आणि अगात्तीहून सचेत या हिंदुस्थानी तटरक्षक दलाच्या जहाजांना बचाव कार्यासाठी वळवण्यात आले. तसेच तात्काळ मदत पुरवण्यासाठी कोची येथे पोहोचणाऱ्या आयएनएस सूरतचे जहाजही वळवण्यात आले आहे.

हिंदुस्थानी नौदल आणि तटरक्षक दलाकडून 18 क्रू मेंबर्सची सुटका करण्यात येत आहे, अशी माहिती संरक्षण विभागाच्या जनसंपर्क विभागाने दिली. MV WAN HAI 503 हे जहाज 7 जून रोजी कोलंबोहून निघाले होते आणि 10 जून रोजी मुंबईला पोहोचणार होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;