Mumbai News – मोबाईल चोरीच्या संशयातून मित्रांकडून मित्रावर चाकूहल्ला, आरोपी अटक

Mumbai News – मोबाईल चोरीच्या संशयातून मित्रांकडून मित्रावर चाकूहल्ला, आरोपी अटक

मोबाईल चोरल्याच्या संशयातून दोन मित्रांनी तिसऱ्या मित्रावर चाकूहल्ला केल्याची घटना वडाळा येथे घडली. या हल्ल्यात पीडित तरुणासह एक आरोपी जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. फैजान शेख असे पीडित तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

फैजान शेख, मोहम्मद हसनैन आणि आसिफ खान हे तिघेही जवळचे मित्र आहेत. तिघेही अँटॉप हिल परिसरातील रहिवासी आहेत. तिघेही मित्र ईद साजरी करण्यासाठी वडाळा परिसरात एकत्र भेटले होते. यावेळी आसिफ खानने त्याचा मोबईल जवळच्या दुकानात चार्जिंगला लावला होता. मात्र तो हे विसरला. मोबाईल सापडत नसल्याने फैजानने आपला मोबाईल चोरल्याचा संशय त्याला आला.

चोरीच्या संशयातून आसिफ आणि फैजानमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर संध्याकाळी ते पुन्हा भेटले असता वाद आणखी वाढला. यानंतर आसिफने फैजानच्या पोटात धारदार शस्त्राने वार केला. या झटापटीत, आसिफच्या डोक्यालाही दुखापत झाली.

पोटात गंभीर दुखापत झाल्याने फैजानला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. आसिफवरही वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्याला अद्याप अटक केलेली नाही. मोहम्मद हसनैनला ताब्यात घेण्यात आले आहे. आसिफला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याच्याविरुद्ध पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;