ट्रम्प-मस्क यांची दोस्ती तुटली अन् नवरा-बायकोत दुरावा वाढला; अमेरिकेतील प्रसिद्ध कपल चर्चेत

ट्रम्प-मस्क यांची दोस्ती तुटली अन् नवरा-बायकोत दुरावा वाढला; अमेरिकेतील प्रसिद्ध कपल चर्चेत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांच्यातील दोस्ती तुटली असून त्यांच्या संबंधातील कटुतेची जगभरात चर्चा होत आहे. आता अमेरिकेतील एक पॉवर कपल या दोन पॉवर व्यक्तिमत्त्वांमधील या लढाईत उतरले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील राजकारणासोबतच या कपलचीही चर्चा जगभरात होत आहे. चर्चेत असलेल्या या पॉवर कपलचे नाव स्टीफन मिलर आणि केटी मिलर आहे. ट्रम्प आणि मस्क यांच्यातील संघर्षात स्टीफन ट्रम्पसोबत एका विश्वासू साथीदाराप्रमाणे उभे आहेत, तर केटीने मस्क यांची बाजू घेतली आहे.

स्टीफन मिलर हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि धोरण व्यवहार उपसंचालक आहेत. त्यांना ट्रम्प यांचे विश्वासू मानले जाते. 2009 पासून ते बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी आवाज उठवत आहेत. 2016 मध्ये ट्रम्प पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा स्टीफन यांचे त्यांच्याशी संबंध अधिक दृढ झाले. ट्रम्प त्यांच्या भाषणात बेकायदेशीर स्थलांतरित आणि मुस्लिमांसाठी दाखवत असलेल्या कठोरपणामागे मिलर आहेत.मात्र, मिलर यांची पत्नी केटी मस्कच्या डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) मध्ये मस्कच्या सल्लागार म्हणून काम करत होती. केटीने मस्कसाठी पूर्णवेळ काम करण्यासाठी व्हाईट हाऊसमधील तिचे पद सोडले आहे. मे 2025 मध्ये मस्क DOGE मधून पायउतार झाल्यानंतर, केटीने देखील व्हाईट हाऊस सोडले आणि मस्कच्या खाजगी क्षेत्रातील कंपन्या टेस्ला आणि स्पेसएक्ससाठी संप्रेषणाशी संबंधित कामात त्यांची प्रमुख भूमिका आहे.

केटी अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती माइक पेन्स यांची प्रेस सेक्रेटरी होती. केटी तिच्या सोशल मीडिया अकाउंट X वर मस्कची प्रशंसा करत सतत पोस्ट करत असते. ती मस्क आणि त्यांच्या कंपन्यांचे टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमोशन करत असते. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की केटीला एलॉन आणि ट्रम्प यांच्यापैकी एकाची निवड करायची होती. ती दोघांचीही निवड करू शकत नव्हती, म्हणून तिने एकाची निवड केली. तर केटीच्या पतीने ट्रम्प यांच्यावरील निष्ठा दाखवत राष्ट्रपतींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मस्कने एक्स मधून स्टीफन मिलरला अनफॉलो केले आहे. त्यामुळे ट्रम्प आणि मस्क यांच्या वादात मिलर दांपत्यांमधील दुरावा वाढत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;