गोवंशासोबत अनैसर्गिक कृत्य करत व्हिडीओ केला व्हायरल; 7 आरोपींना अटक

गोवंशासोबत अनैसर्गिक कृत्य करत व्हिडीओ केला व्हायरल; 7 आरोपींना अटक

विकृत मानसिकतेच्या तरुणांनी गोवंशासोबत अनैसर्गिक कृत्य केले आणि त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमात वायरल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील सात आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. प्रल्हाद राठोड (65), विजय पाल (22), हर्षल घोटेकर (27), विजय ढोके (26), पुरुषोत्तम सहारे (42), नरेश वर्मा (32) शुभम खोब्रागडे (29) अशी आरोपीची नावे असून हे सर्व आरोपी बल्लारपूर शहरातील आहेत.

6 जून रोजी इट्स चंद्रपूर या इन्स्टाग्राम पेजवर ‘रात गोमाता के साथ, दृष्कर्म का प्रयास’ या शीर्षकाखाली बल्लारपूर-कारवा रोडवर गोमातेसह अनैसर्गिक कृत्य करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. 7 जून रोजी बकरी ईद असल्याने हा व्हिडीओ सर्वत्र चांगलाच पसरला. या व्हिडीओमुळे अनेकांचा भावना दुखावल्या. सुभाष वॉर्ड, बल्लारपूर येथील सत्यनारायण खेंगर यांनी याबाबत बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. बल्लारपुरातील पोलीस निरीक्षक गव्हाणे यांनी कलम 299, 3 (5) बीएनएस सहकलम 67 माहिती तंत्रज्ञान अन्वये गुन्हा नोंदवून तपास करण्यात आला. गोवंशासोबत अनैसर्गिक कृत्य करणारे, व्हिडीओ बनवणारे आणि व्हिडीओ शेअर करणाऱ्या सातही जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे करीत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;