Chhattisgarh IED Blast – छत्तीसगडमध्ये आयईडी स्फोटात वरिष्ठ पोलीस अधिकारी शहीद, दोन जण जखमी

Chhattisgarh IED Blast – छत्तीसगडमध्ये आयईडी स्फोटात वरिष्ठ पोलीस अधिकारी शहीद, दोन जण जखमी

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी नक्षलवाद्यांनी लावलेल्या आयईडी स्फोटात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी शहीद झाले. तर दोन पोलीस अधिकारी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एएसपी आकाश राव गिरेपुंजे असे मयत पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. कोंटा-एराबोर रस्त्यावरील दोंड्रा गावाजवळ ही घटना घडली.

सुरक्षा दलाचे जवान परिसरात पायी गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी हा आयईडी स्फोट घडवून आणला. गिरेपुंजे हो 2013 च्या बॅचचे राज्य पोलीस सेवा अधिकारी होते. स्फोटात एएसपी गिरेपुंजे, उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीओपी- कोंटा क्षेत्र) भानुप्रताप चंद्राकर आणि कोंटा पोलीस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर इन्स्पेक्टर सोनल ग्वाला जखमी झाले. जखमी कर्मचाऱ्यांना प्राथमिक उपचारांसाठी कोंटा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान गिरेपुंजे यांचा मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;