नियंत्रण सुटल्याने विद्यापीठाची बस उलटली, अपघातात 15 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

नियंत्रण सुटल्याने विद्यापीठाची बस उलटली, अपघातात 15 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बस कारला धडक देत रस्त्याच्या कडेला पलटली. या अपघातात बसमधील 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अन्य 20 विद्यार्थी अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मलेशियातील पेराक येथे सोमवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे कळते. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सदर बस तेरेन्गानू राज्यातील जेर्टेह येथून पेराकमधील तनजुंग मालीम येथील विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसकडे जात होती. बसमध्ये एकूण 48 विद्यार्थी होते. यादरम्यान पेराकच्या पूर्व-पश्चिम महामार्गावर बसने कारला धडक दिली. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला उलटली आणि अपघातग्रस्त झाली.

अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात 22 विद्यार्थी जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर अन्य सहा विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. प्राथमिक तपासात बसचे अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडल्याचे समोर येत आहे. मात्र अपघाताचा सखोल तपास सुरु आहे. हा अपघात नेमका कसा घडला? हे चौकशीअंती स्पष्ट होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;