मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू, सामानाची गुंतागुंत झाल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज

मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू, सामानाची गुंतागुंत झाल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज

मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सामानाची गुंतागुंत झाल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंब्रा स्थानकाजवळ फास्ट मार्गावर कसाऱ्याहून एक लोकल सीएसएमटीच्या दिशेने जात होती. तर मुंबईहून डाऊन मार्गावर लखनौच्या दिशेने पुष्पक एक्सप्रेस जात होती. तेव्हा मुंब्रा स्थानकाजळ वळणाच्या वेळी काही प्रवासी खाली पडले. या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात आठ जण जखमी झाले असून त्यापैकी एका प्रवाशाच्या हाताला आणि एका प्रवाशाला पायाची गंभीर दुखापत झाली आहे. जखमींपैकी तिघांची ओळख पटलेली असून सर्व जखमींवर कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. सामानाची गुंतागुंत झाल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती या जखमी महिला प्रवाशाने दिली आहे. कसाऱ्याहून आलेल्या लोकलच्या गार्डने याबाबत ठाणे स्थानकात माहिती दिली होती. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे निघालेल्या लोकलमध्ये नेहमीपेक्षा जास्त गर्दी नव्हती. जलद मार्गावर हा अपघात झाला अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;