प्रेमसंबंध ठेवण्यास दिला नकार, प्रियकराने OYO हॉटेलमध्ये चाकूने 17 वेळा केले वार; दोन मुलांच्या आईचा मृत्यू

प्रेमसंबंध ठेवण्यास दिला नकार, प्रियकराने OYO हॉटेलमध्ये चाकूने 17 वेळा केले वार; दोन मुलांच्या आईचा मृत्यू

कर्नाटकमधील बंगळुरुत एका ओयो हॉटेलमध्ये 33 वर्षीय महिलेची तिच्या 25 वर्षीय प्रियकराने चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरिणी, असं मृत महिलेचे नाव असून, आरोपी यशस हा सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. दोघेही बेंगलुरूच्या केंगेरी भागातील रहिवासी होते. ही घटना पूर्णप्रज्ञा लेआउट येथील एका ओयो हॉटेलमध्ये शुक्रवारी मध्यरात्री घडली. जी सोमवारी उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिणी ही दोन मुलांची आई होती आणि तिला यश सोबत आलं नातं संपवायचं होतं. मात्र यशसला तिचा हा निर्णय मान्य नव्हता आणि रागाच्या भरात त्याने हरिणीवर चाकूने 17 वेळा वार करून तिची हत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली, परंतु दोन दिवसांनंतर हॉटेल कर्मचार्‍यांना याची माहिती मिळाली.

सुब्रमण्यपुरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, यशसला अटक करण्यात आली आहे. दक्षिण बंगळुरुचे डीसीपी लोकेश बी. जगलासर यांनी सांगितले की, दोघे गेल्या एका महिन्यापासून एकमेकांना ओळखत होते. हरिणीने नातं तोडण्याचा निर्णय घेल्याने यशस संतापला आणि त्याने हे कृत्य केले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;