भावी पतीसोबत फोनवर बोलली, मग सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत मॉडेलने उचलले टोकाचे पाऊल

भावी पतीसोबत फोनवर बोलली, मग सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत मॉडेलने उचलले टोकाचे पाऊल

सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत सूरतमधील एका 23 वर्षीय मॉडेलने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. अंजली वरमोरा असे आत्महत्या केलेल्या मॉडेलचे नाव आहे. राहत्या घरात पंख्याला गळफास घेत अंजलीने आत्महत्या केली. अंजली मानसिक तणावात होती, यातूनच तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात कळते. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

अंजली एक मॉडेल होती आणि सध्या चार प्रोजेक्टवर काम करत होती. अंजलीचा दोन वर्षापूर्वी साखरपुडा झाला होता आणि या वर्षी तिचे लग्न होणार होते. मात्र तिच्या होणाऱ्या सासूचे निधन झाल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले. शनिवारी रात्री अंजली तिच्या भावी पतीसोबत फोनवर बोलली. त्यानंतर तिने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर भावनिक पोस्ट करत गळफास घेतला.

आत्महत्या करण्यापूर्वी अंजलीने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर दोन भावनिक स्टेटस पोस्ट केले होते. एका स्टेटसमध्ये तिने लिहिले होते, “जे प्रिय होते तेच निघून गेले, हे मला खटकत आहे.” दुसऱ्या स्टेटसमध्ये तिने लिहिले होते, “आज मला पश्चात्ताप होत आहे की मी तुझ्यासाठी काहीच नाही.”

या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अंजलीचा मोबाईल एफएसएलकडे पाठवण्यात आला आहे. तसेच तिचे शेवटचे बोलणे कुणाशी झाले हे शोधण्यासाठी सीडीआर आणि आयडीआर तपासले जात आहे. ज्या स्टुडिओशी ती संबंधित होती त्या स्टुडिओच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे, असे डीसीपी विजय सिंह गुर्जर यांनी सांगितले. या घटनेचा तपास सुरू आहे. तपासाअंती सत्य समोर येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;