Monsoon Trekking- पावसाळी ट्रेकिंगचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या

Monsoon Trekking- पावसाळी ट्रेकिंगचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या

पाऊस पडल्यावर आपली प्रत्येकाची पावलं ही डोंगरमाध्याची वाट चढू लागतात. आपल्यापैकी अनेकांना ट्रेकिंगची आवड असेल तर, पाऊस पडल्यानंतर हमखास आपण डोंगरपठाराच्या वाटांकडे वळतो. ट्रेकिंग हे साहसी असले तरीही, काही ठराविक नियम आपण ट्रेकिंग करताना पाळायलाच हवेत. उगाचच तोंड वर करुन कुठलाही प्रवास करण्यापेक्षा काळजी घेऊनच पावलं उचलणं हे गरजेचं आहे.

ट्रेकिंग करणं हे एक अनोखं सुख आहे. निसर्गासोबत आपण एकरुप होताना, देह भान हरपतं. परंतु पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बाहेर पडताना काही महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. तुम्हीही पावसाळ्यात ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी डोंगरावर जात असाल, तर काही टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा हा पावसाळी ट्रेक सुरक्षित आणि संस्मरणीय होईल.

तुम्हाला पावसाळ्यात ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल तर, सर्वप्रथम योग्य ठिकाण निवडावे लागेल. तुम्ही पावसाळ्यात उंच डोंगररांगांमध्ये ट्रेकिंग करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी जाणार असाल तर, आधी त्या ठिकाणची पूर्णपणे माहिती घ्या. तिथली रेकी आधी करणं हे केव्हाही हितावह.

ज्या भागात पूर किंवा भूस्खलनाचा धोका आहे अशा ठिकाणी कधीही ट्रेकिंगला जाऊ नये.

मान्सून ट्रेकिंग सुरक्षितता टिप्स 

तुम्ही ट्रेकिंगला जात असाल तर तुम्ही ग्रुपमध्ये जावे. विशेषतः पावसाळ्यात, एखाद्याने ग्रुपसोबत बाहेर जायलाच हवे. तुम्ही पावसाळ्यात ग्रुपसोबत ट्रेकिंगला गेलात तर तुम्हाला मजा येईल आणि काही अडचणी आल्यास, कुणीतरी सोबत असल्याने या अडचणीवर मात करणंही सहजशक्य होईल.

 

ग्रुपमध्ये ट्रेकिंगला जाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकमेकांचा हात धरून तुम्ही सर्वात कठीण ट्रेक देखील सहजपणे पार करू शकता. याशिवाय ट्रेकिंग दरम्यान एकमेकांना मार्गदर्शन देखील करता येते.

पावसाळ्यात ट्रेकिंगला जात असाल तर, तुम्हाला वॉटरप्रूफ बॅग खूप गरजेची आहे. या बॅगशिवाय ट्रेकिंगला गेलात तर, तुमचे सामान खराब होईलच पण ट्रेकिंगची मजाही घेता येणार नाही.

 

तुमच्याकडे वॉटर प्रूफ बॅग नसेल, तर तुम्ही सामान प्लॅस्टिकच्या बॅगेत भरुन नेऊ शकता.

तुम्ही पावसाळ्यात डोंगरावर ट्रेकिंगला जात असाल तर तुमच्यासोबत रेनकोट असणे खूप महत्वाचे आहे.

 

रेनकोट व्यतिरिक्त, तुमच्याकडे स्पाइक शूज असणे खूप महत्वाचे आहे. पावसाळ्यात ट्रेकिंग करताना पाय खूप घसरतात. त्यामुळे तुम्ही स्पाइक शूज घातले तर घसरण्याची भीती राहत नाही. आजकाल बाजारात स्वस्त दरात स्पाइक शूज सहज उपलब्ध आहेत.

या टिप्स लक्षात ठेवा

ट्रेकिंगला जाण्यापूर्वी काही आवश्यक औषधे पॅक करायला विसरू नका.
प्रवासासाठी तुम्ही काही फास्ट फूड देखील पॅक करू शकता.
पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी कॅम्पिंग टेंट सोबत ठेवावा.
ट्रेकिंगसाठी तुम्ही टोपी देखील घालू शकता, जेणेकरून तुमच्या डोळ्यावर पावसाचे पाणी येणार नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुमच्या नखांमध्ये ‘हे’ 5 बदल दिसले तर बाळगा सावधगिरी, असू शकतात यकृताच्या आजाराची लक्षणे तुमच्या नखांमध्ये ‘हे’ 5 बदल दिसले तर बाळगा सावधगिरी, असू शकतात यकृताच्या आजाराची लक्षणे
आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांच्या खाण्याच्या सवयी खूप बदलेल्या आहेत. असे म्हटले जाते की जर आपण निरोगी आहार घेतला तर शरीराला...
गळणाऱ्या केसांवर रामबाण आहे हे पतंजलीचे औषध, असे करते परिणाम
अभिनेत्री भाग्यश्रीने तिच्या चमकदार त्वचेचे रहस्य सांगितलं; पाण्यात मिसळायची फक्त ही एक गोष्ट
Chiplun Accident News : चिपळूणमध्ये भीषण अपघात, तब्बल 17 तासानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू
Hair Care- पांढरे केस होतील अगदी कोळशासारखे काळे, फक्त हा एक उपाय करुन बघा
प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवरील बंदी उठवली; हायकोर्टाचा मोठा निर्णय
निवडणूक आयोग नमलं! महाराष्ट्र आणि हरयाणाच्या मतदार याद्यांचा डेटा देणार; राहुल गांधींची मागणी मान्य