Chandrapur News निर्मानाधिन राष्ट्रीय महामार्ग ठरतोय जीवघेणा, दुचाकी अपघातात माय लेकीचा करुण अंत

Chandrapur News निर्मानाधिन राष्ट्रीय महामार्ग ठरतोय जीवघेणा, दुचाकी अपघातात माय लेकीचा करुण अंत

बल्लारपूर – राजुरा दरम्यान निर्मानाधिन राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुणी व तिच्या आईचा जागीच मृत्यू झाल्याने घटना घडली. ज्योती रागीट (42) व त्यांची मुलगी सेजल बंडू रागीट अशी त्या दोघा मायलेकींची नावं आहेत.

या दोघीही दुचाकीने राजुरा येथुन बल्लारपूरकडे जात असताना वर्धा नदीचा पुलाजवळ अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिली. बामणी – राजुरा ते आदिलाबाद या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याची उंची वाढविण्याकरीता मातीचे ढिगारे टाकण्यात आले. कुठल्याही प्रकारचे ठोस नियोजन नसल्याने या धिगाऱ्यावरील माती रस्त्यावर येत आहे. पावसात घसरून तर पाऊस नसताना प्रचंड धुळीचे साम्राज्य या ठिकाणी बघायला मिळत आहे.

नुकत्याच झालेल्या पावसात तर भररस्त्यात चिखल होऊन अनेकांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागला. या मार्गावरून नेहमीच प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत असून वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, अन्यथा अनेकांना प्राणाला मुकावे लागणार असल्याची भीती प्रवाशी व्यक्त करीत आहेत. येथे वारंवार होत असलेल्या अपघात व मृत्यूमुळे परिसरातील नागरिकांत राष्ट्रिय महामार्गाच्या कार्यावर तीव्र रोष व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;