मंदिरात उत्सवादरम्यान मानवी अवशेषांसह डान्स, व्हिडिओ व्हायरल होताच पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

मंदिरात उत्सवादरम्यान मानवी अवशेषांसह डान्स, व्हिडिओ व्हायरल होताच पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यात एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. एका मंदिरात उत्सवादरम्यान चक्क मानवी अवशेष हातात घेऊन डान्स केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वीरवनल्लूर येथील सुदलाईमादा स्वामी मंदिरातील कोडाई उत्सवादरम्यान 6 जून रोजी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले.

कोडाई उत्सवादरम्यान समाकोट्टई वेत्तई म्हणून ओळखल्या जाणारे पारंपरिक अनुष्ठान करण्यात आले. या विधीचा भाग म्हणून पाचही पुरूष स्मशानात गेले आणि अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे अवयवांचे अवशेष घेऊन आले. यानंतर त्यांनी हे अवशेष ग्रामदेवतेला अर्पण म्हणून धार्मिक नृत्य केले.

या सर्व विधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर तिरुनेलवेली पोलिसांनी तात्काळ अ‍ॅक्शन मोडमध्ये येत भारतीय न्याय संहिता कलम 270, 272, 301 आणि तमिळनाडू सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सतत ब्रेड खाल्ल्याने कॅन्सर होतो? तुम्ही पण करतायत तिच चूक? तज्ज्ञ काय सांगतात? सतत ब्रेड खाल्ल्याने कॅन्सर होतो? तुम्ही पण करतायत तिच चूक? तज्ज्ञ काय सांगतात?
जर तुम्ही दररोज नाश्त्यात ब्रेड खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आता ब्रेड अनेक प्रकारात उपलब्ध आहे....
मुंब्रा रेल्वे अपघातात बुलढाण्यातील जवानाचा मृत्यू
मुंबईला लुटून तुम्ही श्रीमंत होऊ शकणार नाही, धारावीच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
नियंत्रण सुटल्याने विद्यापीठाची बस उलटली, अपघातात 15 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
पाकिस्तानची परिस्थिती आणखीनच बिकट, कर्जाचा डोंगर पोहोचला सर्वोच्च स्थानावर
पाच तास 29 मिनिटांचा संघर्ष आणि अल्कराजने IPL विजेत्या RCB ला पिछाडीवर टाकलं, जाणून घ्या कसं?
भावी पतीसोबत फोनवर बोलली, मग सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत मॉडेलने उचलले टोकाचे पाऊल