घणसोलीत विकासकामांची लटकंती; शिवसेनेची विभाग कार्यालयावर धडक

घणसोलीत विकासकामांची लटकंती; शिवसेनेची विभाग कार्यालयावर धडक

नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून घणसोली विभागात सुरू असलेल्या अनेक विकासकामांची लटकंती झाली आहे. पावसाळा सुरू झाला तरी पावसाळापूर्वीची कामे अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाहीत. याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विभाग कार्यालयावर धडक देऊन विभाग अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला.

घणसोली गाव आणि परिसरात अनेक ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. रस्त्यावरील खड्डे, अनधिकृत फेरीवाले, नालेसफाई, उघडी गटारे, घनकचरा, स्ट्रीट लाईट, पार्किंग या समस्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. महापालिकेच्या या गलथान कारभाराचा जाब विचारण्यासाठी जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी घणसोली विभाग कार्यालयावर धडक दिली. याप्रसंगी जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख आत्माराम सणस, उपशहरप्रमुख मंगेश साळवी तानाजी सूर्यवंशी, उपजिल्हा संघटक सुप्रिया लाड, शहर संघटक मंजुळा म्हात्रे, विधानसभा संघटक स्मिता लोंढे, शहर युवाधिकारी सचिन आसबे, उपशहर संघटक सुरेखा साळेकर, विभागप्रमुख सखाराम सुर्वे, प्रेमनाथ म्हात्रे, अशोक जाधव, भरत चव्हाण, नीलेश शेलार आदी उपस्थित होते.

…तर तीव्र आंदोलन छेडू
घणसोली विभाग हा नागरी संमस्यांचे आगार बनला आहे. या विभागात अनधिकृत बांधकामांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. पावसाळापूर्वीची कामे अपूर्ण राहिल्याने नागरिकांना अनके अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या सर्व समस्या येत्या पंधरवड्यात मार्गी लागल्या नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे, असा इशारा जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;