Gas After Eating Food- पोटातील गॅसवर प्रभावी उपाय, फक्त पाच सेकंदात होईल झटक्यात सुटका

Gas After Eating Food- पोटातील गॅसवर प्रभावी उपाय, फक्त पाच सेकंदात होईल झटक्यात सुटका

अनेकांना जेवणानंतर पोटात जडपणा, आम्लपित्त, छातीत जळजळ किंवा गॅसची समस्या भेडसावते. यामागील कारणे जास्त तळलेले अन्न खाणे, जेवल्यानंतर लगेच बसणे किंवा झोपणे किंवा अनियमित खाण्याच्या सवयी असू शकतात. गॅस झालाय असं वाटल्यावर सर्वसामान्य माणसं लगेचच औषधे घ्यायला सुरुवात करतात. परंतु तुम्हाला नैसर्गिक पद्धतीच्या माध्यमातून गॅसवर मात करायची असेल तर, एक खास पद्धत नक्की अवलंबून बघा.

अन्न खाल्ल्यानंतर तुम्हाला फक्त 5 ते 6 सेकंदात पोटातील गॅस किंवा आम्लतेपासून आराम मिळू शकतो. यासाठी जेव्हा तुम्हाला ही समस्या असेल तेव्हा बर्फाचे थंड पाणी प्या. किंवा काही सेकंद हे पाणी तोंडात धरा. तुम्ही काही सेकंदांसाठी तोंडात थंड पाणी धरता तेव्हा ते व्हॅगस नर्व्ह सक्रिय करते. व्हॅगस नर्व्ह ही आपल्या पचनसंस्थेशी जोडलेली एक महत्त्वाची नर्व्ह आहे. ही पोटातील आम्लाची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. जेव्हा ते सक्रिय होते, तेव्हा पोटातील आम्ल निष्क्रिय होऊ लागते आणि छातीत जळजळ, गॅस किंवा आम्ल रिफ्लक्स सारख्या लक्षणांपासून त्वरित आराम मिळतो.

या प्रक्रियेनंतर किमान 2-3 तास ​​पोट रिकामे ठेवावे. जेणेकरुन आपल्या पचनसंस्थेला पूर्ण विश्रांती मिळते आणि पोटातील आम्ल पातळी नियंत्रित राहते. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला अ‍ॅसिडिटी किंवा छातीत जळजळ होते. हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक असल्याकारणाने, कोणत्याही दुष्परिणामांशिवाय त्वरित आराम तुम्हाला मिळवता येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;