अखेर ठाणे पालिकेने दिव्यातील कचरा उचलला; शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासनाला आली जाग

अखेर ठाणे पालिकेने दिव्यातील कचरा उचलला; शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासनाला आली जाग

दिवा प्रभाग समिती अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक 28 मधील कचरा जवळपास 8 महिन्यांपासून उचलला गेला नव्हता. याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ठाणे महापालिका प्रशासनाला कचरा उचलला गेला नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला. शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग आली असून अखेर ठाणे पालिकेने दिव्यातील कचरा तत्काळ उचलला आहे.

ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक 28 मधील दातिवलीगाव स्मशानभूमीजवळील कचरा जवळपास 7 ते 8 महिन्यांपासून उचलला गेला नव्हता. त्या कचरा टाकलेल्या जागेची डम्पिंग ग्राऊंडपेक्षा वाईट परिस्थिती झाली होती. त्याचा परिणाम आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांवर व शाळेतील विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात होत होता. तेथील नागरिकांनी शिवसेनेच्या दातिवली शाखेत तक्रारदेखील केली होती. या तक्रारीची दखल घेत कल्याण ग्रामीण महिला विधानसभा संघटक योगिता नाईक यांनी सहाय्यक आयुक्तांची भेट घेतली. कचरा तत्काळ उचलावा अशी विनंती करत आंदोलनाचा इशारा नाईक यांनी दिला होता.

अधिकाऱ्यांनी जेसीबी व डंपर मागवले
झोपेचे सोंग घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या. अधिकाऱ्यांनी कचरा उचलण्यासाठी आज तत्काळ जेसीबी व डंपर मागवले. हा परिसर कचरामुक्त केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. इतक्या महिन्यात न उचललेला कचरा उचलला गेला असल्याने योगिता नाईक यांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;