Gondia News – पिंडदान करताना तोल जाऊन महिला नदीत कोसळली, वाचवायला गेलेल्या दोघींसह तीन जणी बुडाल्या

Gondia News – पिंडदान करताना तोल जाऊन महिला नदीत कोसळली, वाचवायला गेलेल्या दोघींसह तीन जणी बुडाल्या

पिंडदान करताना तोल जाऊन नदीत पडल्याने तीन महिलांचा बुडून मृत्यू झाला. गोंदिया तालुक्यातील रजेगावजवळ बाघ नदीच्या करोणी घाटावर ही घटना घडली. समिता टेंभरे, मिनाक्षी बघेले आणि मीराबाई तुरकर अशी मयत महिलांची नावे आहेत. तिनही महिला नागपूर शहराजवळील हिंगणा येथील रहिवासी असून बाघ नदीवर नातेवाईकाच्या पिंडदानासाठी आल्या होत्या.

पिंडदान करताना समिता टेंभरे या महिलेचा पाय घसरला आणि त्या पाण्यात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी मिनाक्षी आणि मीराबाई यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र कुणालाही पोहत येत नसल्याने तिघीही नदीत बुडाल्या. आरडाओरडा ऐकून आसपासच्या लोकांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने शोध मोहिम राबवत तिनही मृतदेह बाहेर काढले. रावणवाडी पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;