अपघाताची जबाबदारी रेल्वे टाळू शकत नाही; अजित पवार यांचे स्पष्ट मत

अपघाताची जबाबदारी रेल्वे टाळू शकत नाही; अजित पवार यांचे स्पष्ट मत

मुंब्रा- दिवा स्थानकादरम्यान झालेली रेल्वे अपघाताची घटना दुर्देवी आहे. या अपघातीची जबाबदारी रेल्वे विभागाची असून ते ती जबाबदारी टाळू शकत नाही, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. या अपघाताबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार असून मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी पावले उचलण्यास सांगणार आहोत, असेही ते म्हणाले.

पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवासी पडून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, या अपघाताशी पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन लोकलमधील फूटबोर्डवर लटकलेल्या प्रवाशांच्या बॅगा घासून हा अपघात झाला आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाकडून मदत जाहीर करण्यात येईल. तसेच मुख्यमंत्रीही मदतीची घोषणा करतील.

मुंबईतील वाढती गर्दी आणि लोकल प्रवाशांच्या समस्या गंभीर होत आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी आता पावले उचलावी लागणार आहेत. त्यासाठी आपण रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. तसेच वाढती गर्दी आणि अपघात रोखण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. रेल्वेला मेट्रोसारखे बंद दरवाजे करण्याचा पर्यायाचा विचार होत आहे. मात्र, तो किती व्यवहार्य ठरेल, याचाही विचार करावा लागणार आहे. तसेच रेल्वेचे डबे वाढवायचे म्हणजे फलाटाची लांबी, रुंदी वाढवावी लागणार आहे. तसेच दरदोन मिनिटांनी ट्रेन असते. तसेच गर्दी कमी करण्यासाठी मेट्रो अधिक सक्षम करण्यात येत आहेत. जलद प्रवासासाठी कोस्टल रोड आहे. मात्र, आता या अपघाताची चौकशी होणार असून त्यातून सत्य उघज होईल, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;