पाच तास 29 मिनिटांचा संघर्ष आणि अल्कराजने IPL विजेत्या RCB ला पिछाडीवर टाकलं, जाणून घ्या कसं?
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक वेळ चाललेल्या अंतिम लढतीत स्पेनच्या कार्लेस अल्काराजने ऐतिहासिक कामगिरी करत यानिक सिनरचा पराभव केला. तब्बल पाच तास 29 मिनिटे ही लढत रंगली. दोघांनीही सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन केलं परंतु अखेर अल्कराजने बाजी मारली. त्याला मिळालेलं बक्षीय IPL 2025 विजेत्या RCB पेक्षाही अधिक आहे. त्यामुळे अल्कराजच्या बक्षिसाची सध्या जोरदार चर्चा रंगतीये, कारण त्याने ते एकट्याने जिंकलं आहे.
IPL 2025 मध्ये अंतिम लढतीत पंजाब किंग्जचा पराभव करत 18 वर्षांनी बंगळुरूने विजेतेपद पटकावले. दमदार सांघिक खेळ केल्यामुळे बंगळुरूने आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. यासोबत त्यांना बक्षीस स्वरुपात 20 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. 11 खेळाडूंनी केलेल्या कामगिरीच हे फळ आहे. परंतु फ्रेंच ओफन जिंकणाऱ्या अल्कराजचा पराक्रम आयपीएल विजेच्या बंगळुरूपेक्षा वरचढ ठरलाय. कार्लोस अल्काराझने आतापर्यंत पाच ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत धडक मारली आणि पाचही वेळा तो विजेतेपदाचा मानकरी ठरला आहे. फ्रेंच ओपनचे विजेतेपद हे त्याचे पाचवे ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले आहे. या विजयासह त्याला ट्रॉफीसह 2.55 दशलक्ष युरोंचं बक्षीस मिळालं आहे. म्हणजेच 24 कोटी 94 लाखांचा तो मानकरी ठरला आहे. आणि हे बक्षीस त्याने एकट्याने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर मिळवलं आहे.
कसोटी जगज्जेतेपद ऑस्ट्रेलियाच राखणार, क्रिकेट दिग्गजांनी आधीच वर्तवले भाकीत
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List