आलिया भट्ट-रणबीर कपूरचा 250 कोटींचा बंगला तयार, मात्र नवीन गेट बांधण्यासाठी पैसे नाहीत! वाचा
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. आलिया आणि रणबीरचा मुंबईतील पाली हिलमधील बंगला बऱ्याच दिवसांपासून बांधला जात होता, आता बंगला पूर्णपणे तयार झालेला आहे. रिपोर्ट्सनुसार बंगल्याचे काम 2024 मध्ये पूर्ण झाले होते. परंतु आता बंगल्याचे संपूर्ण टचअपचे काम पूर्ण झाले आहे. हा बंगला आता पूर्णपणे राहण्यासाठी तयार झालेला आहे. नुकताच या आलिया आणि रणबीरच्या बंगल्याचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये बाहेरुन हा बंगला खूपच सुरेख दिसत आहे. रणबीर आणि आलियाचा हा बंगला रणबीरचे आजोबा राज कपूर यांचे होते.

रिपोर्ट्सनुसार या बंगल्याची किंमत 250 कोटी रुपये इतकी आहे. या बंगल्यातील प्रत्येक मजल्यावरील बाल्कनीमध्ये झाडांच्या कुंड्या ठेवून बाल्कनीला अनोखा लूक देण्यात आलेला आहे. बंगल्याचा दरवाजा मात्र पूर्वीचाच ठेवण्यात आलेला आहे. आधीपेक्षा हा बंगला आता अधिकाधिक सुंदर आणि अधिक आकर्षक पद्धतीने सजवण्यात आलेला आहे. रणबीर आणि आलिया हे त्यांच्या सुरक्षेबद्दल खूप सावध आहेत आणि विशेषतः राहाच्या सुरक्षेचा विचार केला तर, बंगल्यातील संपूर्ण व्यवस्था त्यानुसार करण्यात आली आहे.
आलिया-रणबीरचे घर छान दिसतंय पण त्याचा दरवाजा जुना आहे आणि त्यामुळे त्यांना खूप ट्रोल केलं जात आहे. एका वापरकर्त्याने लिहिले- गेट इतके स्वस्त का बनवले गेले? फक्त गेट बदललेला नाही. तर दुसऱ्याने लिहिले: इतका खर्च झाला आहे की नवीन गेट बांधण्यासाठी पैसे उरले नाहीत. एकाने लिहिले- रणबीर म्हणत असेल की, तो गेट बांधणार नाही.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अनेकदा बंगल्याच्या कामावर लक्ष ठेवून असायचे. त्यामुळे ते सतत या भागात काम पाहण्यासाठी यायचे. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी राहा देखील अनेक वेळा या बंगल्यात आलेली आहे. तसेच रणबीर कपूरसोबत त्याची आई नीतू कपूरही घरकाम पाहण्यासाठी गेली आहे. आता चाहते त्यांच्या घराच्या आतील भागाची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List