Hair Care- पांढरे केस होतील अगदी कोळशासारखे काळे, फक्त हा एक उपाय करुन बघा

Hair Care- पांढरे केस होतील अगदी कोळशासारखे काळे, फक्त हा एक उपाय करुन बघा

केस पांढरे होणे हे समस्या आजकाल सर्वांनाच भेडसावत आहे. त्यामुळेच सध्या केस काळे करण्यासाठी नानाविध उपाय शोधतात. परंतु अनेकदा रासायनिक हेअर डाय वापरल्याने केस खराब होण्याचा आणि गळण्याची शक्यता असते. पांढऱ्या केसामुळे आपला लूक बदलतो, चेहऱ्यावरील तेजही जाते. त्यामुळे पांढरे केस दिसण्यापेक्षा ते काळे करणे हा उपाय अनेकांनी स्विकारलेला आहे. बाजारातील डायमध्ये रसायनांचा वापर असल्यामुळे, केस लगेच काळे होतात. पण यामुळे आपले केसही खूप गळायला सुरुवात होते. घरी केसांना डाय लावणं हे अनेकांना कटकटीचे वाटते. परंतु नैसर्गिक घटकांचा वापर करुन केसांना काळा रंग अगदी घरच्या घरी सुद्धा देता येऊ शकतो. तेच आपण पाहुया.

 

संबंधित बातम्या: केस गुडघ्यापर्यंत लांब होतील, आजपासूनच तुमच्या आहारात या ‘7’ आयुर्वेदिक पदार्थांचा समावेश करा  

केस काळे करताना या गोष्टी लक्षात ठेवा

तुमच्या डोक्यावरील त्वचेला समस्या येऊ नये म्हणून मेंदीमध्ये घालण्यात येणाऱ्या घटकांची पॅच टेस्ट करा.
जर तुम्हाला हवे असेल तर केस काळे करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या.

आठवड्यातून फक्त एकदाच केसांना मेंदी लावा. यामुळे तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होतील.
अशा प्रकारे तुम्ही तुमचे पांढरे केस काळे करू शकता. हे लावल्याने तुमच्या केसांमध्ये चमक येईल. यासोबतच केसांची वाढ देखील सुरू होईल.

असे करा तुमचे केस काळे

तुम्हाला एका भांड्यात मेंदी घ्यावी लागेल. त्यात काळा चहा मिसळून घ्यावा. यानंतर, त्यात थोडे खोबरेल तेल घालावे. हे सर्व पदार्थ लोखंडी तव्यात किंवा कढईमध्ये भिजवावे. लोखंडी तव्यात भिजवल्यामुळे मेंदीचा काळेपणा अधिक वाढतो. किमान ४ तास ही मेंदी भिजू द्यावी. त्यानंतर केसांना लावावी. ही मेंदी सुकल्यानंतर केसांना मस्त रंग चढतो. मेंदी धुतल्यानंतर केस शॅम्पूने धुवावे.

हे वापरल्याने तुम्हाला बाजारातील केसांचा रंग वापरण्याची गरज भासणार नाही. यामुळे तुमचे केस काळे होतील.

 

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

संबंधित बातम्या:Hair Care- केसगळती रोखण्यासाठी फक्त एक तुकडा पुरेसा आहे, जाणून घ्या दालचिनीचे केसांसाठी फायदे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;