मोदी सरकारची 11 वर्ष म्हणजे फक्त प्रचार, मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातावरून राहुल गांधी यांची टीका

मोदी सरकारची 11 वर्ष म्हणजे फक्त प्रचार, मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातावरून राहुल गांधी यांची टीका

मोदी सरकारची 11 वर्ष म्हणजे फक्त प्रचार आहे अशी टीका काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या जखमी प्रवाशांसाठी त्यांनी प्रार्थनाही केली आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले आहे की, मोदी सरकार आपल्या सरकारची 11 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद साजरा करत आहे. आणि दुसरीकडे मुंबईजवळ झालेल्या लोकलच्या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. भारतीय रेल्वे कोट्यवधी जनतेचा जगण्याचा आधार आहे. पण आता हीच रेल्वे असुरक्षितता, गर्दी आणि अव्यवस्थेचं प्रतीक बनलंय.

मोदी सरकारची 11 वर्ष म्हणजे ना जबाबदारी, ना बदल फक्त प्रचार. सरकार 2025 बद्दल बोलणं सोडा आता 2047 ची स्वप्न विकत आहे. आज देशाची काय अवस्था आहे याकडे कोण पाहणार? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहेत.
तसेच मी मृतांच्या कुटुंबीयांशी संवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे होवो अशी प्रार्थना करतो असेही राहुल गांधी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;