पुण्याला पावसाने झोडपले

पुण्याला पावसाने झोडपले

पावसाने सलग तिसऱ्या दिवशी पुणे शहरासह जिह्याला झोडपून काढले. पुण्यात दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रस्ते जलमय झाले होते. मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्ये जोरदार सरी कोसळल्या. शहरभर पाण्यामुळे वाहनचालकांना मार्ग काढताना कसरत करावी लागली. काही तासच झालेल्या पावसामुळे पालिकेच्या ड्रेनेज व नालेसफाईची पुन्हा पोलखोल झाली आहे.

दिवे घाटात ढगफुटीसदृश

 पुणे-सासवड महामार्गावरील दिवे घाटात दुपारी ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. तास ते दीड तासाच्या पावसाने घाटरस्ता पाण्याखाली गेला होता. घाटातील प्रत्येक वळणावर धबधबे खळाळत होते. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने दुचाकीस्वारांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;