उपायुक्त वैभव साबळे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी

उपायुक्त वैभव साबळे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी

लाचप्रकरणी अटकेत असलेला महापालिकेचा उपायुक्त वैभव विजय साबळे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती लाचलुचपतचे उपअधीक्षक अनिल कटके यांनी दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, तक्रारदार तानाजी रुईकर यांच्या कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवाना मंजुरीसाठी उपायुक्त साबळे याने दहा लाखांच्या लाचेची मागणी केली. याबाबत 17 फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 25 तारखेला पडताळणी करण्यात आली. पडताळणीत साबळे याने स्वतःसाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती सात लाखांच्या लाचेची मागणी साबळे याने केल्याने सोमवारी कारवाई केली. साबळे याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

दरम्यान, साबळे याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यात त्याच्या सांगली आणि सातारा येथील घरांवर छापेमारी करण्यात आली आहे. काही महत्त्वाची कागदपत्रे तपासणी करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;