कोल्हापुरात पावसाचे पुन्हा धुमशान, पंचगंगेच्या पातळीत तब्बल 10 फुटांची वाढ; 13 बंधारे पाण्याखाली

कोल्हापुरात पावसाचे पुन्हा धुमशान, पंचगंगेच्या पातळीत तब्बल 10 फुटांची वाढ; 13 बंधारे पाण्याखाली

गुरुवारी ढगफुटीसदृश झालेल्या पावसानंतर काहीसा दिलासा मिळाला असतानाच, जिह्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्रभर पावसाचे धुमशान सुरू होते. दिवसभर कधी संततधार, तर कधी रिपरिप सुरू होती. राधानगरीसह कुंभी, कासारी धरणांतून विसर्ग सुरू झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. गेल्या 24 तासांत पंचगंगा नदीची पाणीपातळी नऊ ते दहा फूट वाढली. सायंकाळी सहापर्यंत पंचगंगा, कासारी, भोगावतीसह दूधगंगा नदीवरील तब्बल तेरा बंधारे पाण्याखाली गेले असून, आणखी बंधारे पाण्याखाली जाऊन मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. अगोदरच ओलाचिंब झालेला कोल्हापूर जिल्हा आता गारठल्याचेही दिसून येत आहे.

कोल्हापूर जिह्यात तीन दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने काहीशी उघडीप दिली होती. आज मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दुपारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. तसेच ‘रेड अलर्ट’ही देण्यात आला होता. त्यानुसार ठिकठिकाणी जोरदार, तर कुठे मुसळधार पाऊस झाला.

धरणक्षेत्रात अतिवृष्टी तसेच धरणांतून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पात्रात झपाटय़ाने पाणीपातळी वाढत आहे. पंचगंगा नदीवरील शहरातील राजाराम बंधाऱ्यावर आठवडय़ात दुसऱ्यांदा पाणी आल्याने सकाळपासून या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

राधानगरीतून 2500 क्युसेकने विसर्ग

राधानगरी धरणाचा विसर्ग एक हजार क्युसेकने वाढवून 2500 क्यूसेक करण्यात आल्याने भोगावती, पंचगंगा नदीकाठच्या तसेच कुंभी मध्यम प्रकल्पाच्या विद्युतगृहामधून 300 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कुंभी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;