केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचे सरकारचे आदेश

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचे सरकारचे आदेश

केदारनाथजवळ खाजगी कंपनीचे (रविवार 15 जून) हेलिकॉप्टर कोसळले. आता दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली आहे. रविवारी भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर केदारनाथमध्ये कोसळले. त्यानंतर हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आली होती. या अपघातात आर्यन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडच्या हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या सर्व सात जणांचा जागीच मृत्यू झाला. केदारनाथमध्ये सातत्याने अनेक हेलिकॉप्टर अपघात घडत आहेत, यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

केदारनाथमधील मोठे हेलीकॉप्टर अपघात


25 जून 2013, गौरीकुंडजवळ एमआय-17 हेलीकॉप्टर कोसळले, 21 ठार

28 जून 2013 केदारनाथपासून दोन किमी पुढे गरुडचट्टी येथे हेलीकॉप्टर कोसळले, 3 जण ठार

18 ऑक्टोबर 2022 केदारनाथहून गुप्तकाशीला जाणारे हेलीकॉप्टर गरुडचट्टीजवळील टेकडीवर आदळल्याने कोसळले, 7 जण ठार

15 जून 2025 केदारनाथहून गुप्तकाशीला परतणारे हेलीकॉप्टर गौरी माई खार्कजवळ कोसळले, 7 जण ठार

रविवारच्या घटनेनंतर, राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि हेलीकॉप्टर अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यासोबतच हेली उड्डाणांच्या चांगल्या समन्वयासाठी ‘कमांड अँड कोऑर्डिनेशन सेंटर’ स्थापन करण्याचे निर्देशही दिले. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, चार धामसाठी हेली सेवा सोमवारपर्यंत पूर्णपणे बंद राहील. त्यांनी म्हटले होते की, “चार धाममध्ये सेवा देणाऱ्या सर्व हेली ऑपरेटर्स आणि वैमानिकांचा उड्डाण अनुभव उच्च हिमालयीन प्रदेशात तपासला जाईल आणि सर्व हेली ऑपरेटर्सशी बैठक झाल्यानंतरच हेलीकाॅप्टर सेवा सुरू केली जाईल.”

रविवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातासंदर्भात निष्काळजीपणाबद्दल उत्तराखंड सरकारने आर्यन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गौरीकुंड आणि त्रियुगीनारायण दरम्यान गौरी माई खार्कच्या जंगलात खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे झालेल्या अपघातात, हेलिकॉप्टरमधील पायलटसह सर्व 7 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;