मोदी यांना 21 व्या देशाचा सर्वोच्च सन्मान

मोदी यांना 21 व्या देशाचा सर्वोच्च सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सायप्रस देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी मोदींना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. मोदींना मिळालेला आतापर्यंतचा हा 21 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.

कॅनडामध्ये होणाऱ्या जी 7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी रवाना झाले. त्या आधी ते दोन दिवस सायप्रसच्या दौ-यावर आहेत. मोदींच्या सायप्रस दौऱ्याचा आज दुसरा दिवशी असून आज संध्याकाळी ते पॅनडाला रवाना होणार आहेत. आज सुरुवातीला सायप्रसच्या राष्ट्रपती भवनात मोदींचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांमधील व्यापाराला चालना देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मोदी रविवारी सायप्रसला पोहोचले होते. सायप्रसला भेट देणारे मोदी हे तिसरे हिंदुस्थानी पंतप्रधान आहेत. या आधी इंदिरा गांधी यांनी 1983 साली आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी 2002 साली सायप्रसला भेट दिली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;