संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा नगर जिह्यात प्रवेश

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा नगर जिह्यात प्रवेश

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळय़ाने आज अहिल्यानगर जिह्यात प्रवेश केला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृत उद्योग समूहाच्या वतीने वारकऱयांची सर्व सुविधा करण्यात आली आहे.

श्री विठ्ठलभेटीच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या या पालखी सोहळय़ाचे सुमारे 20 हजार वारकऱयांसमवेत आगमन झाले. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व इंद्रजित थोरात यांच्यासह पारेगाव बु. गावकऱयांनी पालखी सोहळय़ाचे अभूतपूर्व स्वागत व पूजन केले. याप्रसंगी निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष ऍड. सोमनाथ घोटेकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक देवीदास ढुमने, ऍड. त्र्यंबकराव गडाख, साहेबराव गडाख, दौलत गडाख, सोमनाथ गडाख, सचिन गडाख, बी. आर. चकोर, नवनाथ आरगडे, विजय राहणे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

रिमझिम पावसात आणि हरिनामाच्या गजरात पालखी सोहळय़ाने नगर जिह्यात प्रवेश केला. अश्विनाथ विद्यालयाचे लेझीम पथक, पारंपरिक वाद्य व वेशभूषा करून गावकऱयांनी व विद्यार्थ्यांनी या पालखीचे स्वागत केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;