मुसळधार पावसात देवदूत बनून धावले संगमेश्वर पोलीस; घरात अडकलेल्या नागरिकांना पुराच्या पाण्यातून वाचवले

मुसळधार पावसात देवदूत बनून धावले संगमेश्वर पोलीस; घरात अडकलेल्या नागरिकांना पुराच्या पाण्यातून वाचवले

कोकणात मुसळधार पावसाने थैमान घातले असून जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. विशेषतः संगमेश्वर खाडीपट्ट्‌यात सोमवारी पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे अनेक नागरिक अडकून पडले होते. मात्र, अशा कठीण प्रसंगी संगमेश्वर पोलिसांनी देवदूतासारखी धाव घेऊन लोकांचे प्राण वाचवले. त्यांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, डीवायएसपी जयश्री गायकवाड, संगमेश्वर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली. मुसळधार पाऊस आणि पुराच्या लोंढ्यात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. धामणी येथील सनराईज हॉटेलजवळील पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले.

या बचावकार्यात पोलीस निरीक्षक शंकर नागरगोजे, पोलीस अंमलदार सचिन कामेरकर, विनय मनवल, सतीश कोलगे, गिरीजाप्पा लोखंडे, आणि उत्तम साळवे यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. मनुष्यहानी होऊ नये यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि पुराच्या पाण्यातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले.केवळ बचावकार्यच नव्हे, तर ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती, त्या ठिकाणी लोकांना जनजागृती करण्याचे कामही पोलिसांनी केले. लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासंदर्भात मार्गदर्शन करून संभाव्य धोका टाळण्यास मदत केली.

संगमेश्वर पोलिसांच्या या समयसूचकता आणि धाडसी कामगिरीमुळे मोठी दुर्घटना टळली असून, त्यांनी आपल्या खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवले आहे. रत्नागिरी जिल्ह्यावर आलेल्या या नैसर्गिक आपत्तीत पोलिसांनी बजावलेली ही भूमिका निश्चितच कौतुकास्पद असून, नागरिकांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;