नितेश राणेंचा पोपट झाला रे, सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून संजय राऊत यांचा टोला

नितेश राणेंचा पोपट झाला रे, सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून संजय राऊत यांचा टोला

नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली होती. ते आता भाजपमध्ये सामील होणार आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी याच बडगुजरांवर आरोप केले होते. त्यामुळे भाजपमध्ये नितेश राणे यांचा पोपट झाला असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

सुधाकर बडगुजर जेव्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात असताना त्यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले होते. मुंबई बॉम्बस्फोटात आरोपी असलेला सलीम कुत्ता आणि बडगुजर यांचे संबंध आहेत असा आरोप नितेश राणे यांनी नागपुरात विधीमंडळात केला होता. आता हेच बडगुजर भाजपमध्ये सामील होणार आहेत. यावर संजय राऊत म्हणाले की, ह्याचा (नितेश राणे) आज खऱ्या अर्थाने “पोपट ..” झाला रे…


बॉम्ब ब्लास्ट मधील सलीम कुत्ता चे बॉस भाजपा मध्येच बसलेत! तसेच या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे! गृह मंत्री फडणवीस तुमचे लोक त्या सलीम कुत्ताला उगाच बदनाम करीत होते; भारतीय जनता पक्ष हा निर्लज्ज लोकांचा भरणा असलेला पक्ष आहे, देशभक्ती, हिंदुत्व वगैरे सगळे ढोंग आहे असेही संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;