कळंबणीजवळ रस्त्याला भेगा, कशेडी बोगद्याजवळ दरड कोसळली

कळंबणीजवळ रस्त्याला भेगा,  कशेडी बोगद्याजवळ दरड कोसळली

गेले दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस सुरू असून मुंबई-गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात खेड तालुक्याच्या हद्दीत भुयारी मार्गाच्या सुमारे आधी 200 मीटर अंतरावर दरड कोसळली. ही घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली. यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

गेल्या महिन्यातसुद्धा या ठिकाणी दरड कोसळून वाहतुकीचा खोळंबा झाला होता. रविवारी सायंकाळी पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक एकाच लेनवरून सुरू ठेवण्यात आली. जवळपास दीड तासानंतर दरड हटविण्यासाठी यंत्रणा पाठवून दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. 

वाळंजवाडी हायवेच्या पुलाला दोन्ही बाजूने तडे, पूल धोकादायक

मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी येथे रस्ता खचल्याची घटना घडली आहे. वाळंजगाडी येथील ओढय़ावरील पुलाच्या दोन्ही बाजूला काँक्रीटला मोठे तडे गेले असून रस्ता खचायला सुरुवात झाली आहे. वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाल्यामुळे रस्ता तत्काळ बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. स्थानिकांनी खबरदारी म्हणून महामार्गावर झाडाच्या फांद्या टाकल्या आहेत. ही घटना तीन-चार दिवसांपूर्वी घडली असली तरी आज रात्रीपासून परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. मौजे कळंबणी बुद्रुक हद्दीमध्ये वाळंजवाडी येथे हायवेच्या पुलाच्या दोन्ही बाजूने तडे, पूल धोकादायक बनला आहे. हायवेवर वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.

खेड शहराचा पाणीपुरवठा बंद

मुंबई महामार्गावरील जगबुडी पुलाखालील पाण्याची मेन पाईपलाईन नादुरुस्त झाली होती. त्याच दिवशी मेन लाईनचे दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. परंतु पावसामुळे जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे व भरणा जॅकवेल येथील सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने मेन पाईपलाईन पुन्हा नादुरुस्त झाली आहे. सदर ठिकाणावरील नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच खंडित झालेल्या जलवाहिनीचे काम सुरू करणार आहे. जलवाहिनीचे काम करण्यास वेळ लागण्याची शक्यता असल्याने खेड शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;