ब्रेन चिपमुळे माकडांना दिसलं काल्पनिक दृश्य! मस्क यांच्या न्यूरालिंक उपकरणाची कमाल

ब्रेन चिपमुळे माकडांना दिसलं काल्पनिक दृश्य! मस्क यांच्या न्यूरालिंक उपकरणाची कमाल

इलॉन मस्क यांची कंपनी ‘न्यूरालिंक’ने एक असे उपकरण विकसित केलंय, जे नसलेली गोष्ट तुम्हाला दाखवेल. सध्या या ब्रेन चिपचा प्रयोग माकडांच्या मेंदूवर सुरू आहे. हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला आहे. ब्रेन चिपमुळे माकडांना काल्पनिक दृश्य दिसू लागले. येत्या काळात ब्रेन चिपचा प्रयोग मानवावर होणार आहे. नेत्रहिनांसाठी हा प्रयोग म्हणजे आशेचा किरण ठरेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला.

‘न्यूरालिंक’ने माकडांच्या मेंदूत चिप बसवली आहे. ब्लाइंडसाईट असे या उपकरणाचे नाव आहे. माकडांमध्ये ब्रेन इम्प्लांट टेस्टिंग सुरू आहे. या प्रयोगातून मानवाला सुपरपॉवर मिळण्याचा दावा केला जात आहे. या प्रयोगांतर्गत जी गोष्ट वास्तवात नाही, ती माकडांना दिसू लागली आहे. नेत्रहिनांना दिसावे या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल समजले जात आहे.

न्यूरालिंक इंजिनीअर जोसेफ ओ’डोहर्टी यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत या प्रयोगाची माहिती दिली. ब्लाइंडसाईट उपकरणाने माकडांच्या मेंदूतील दृष्टीशी संबंधित भाग उत्तेजित केला. त्यामुळे क्षणार्धात माकडांनी आपले डोळे अशा ठिकाणी फिरवले, ज्याची कल्पना करण्यासाठी मेंदूला प्रेरित करण्याचे काम संशोधक करत होते. ब्लाइंडसाईट उपकरणाचे निष्कर्ष पहिल्यांदाच सर्वांसमोर मांडण्यात आले आहेत.

  • ब्रेन चिप एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यासारखेच काम करते.
  • ब्लाइंडसाईट उपकरणाची चाचणी गेल्या अनेक वर्षांपासून माकडांवर सुरू आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत मानवावर त्याची चाचणी केली जाईल.
  • अतिशय आव्हानात्मक वैद्यकीय स्थितीत या उपकरणाचा वापर होऊ शकतो. अद्याप या उपकरणाला अमेरिकेने मानवी वापरासाठी संमती दिलेली नाही. प्राण्यांवरील अभ्यासातून काढलेले निष्कर्ष मानवासाठी किती लागू होतात, हे पाहावे लागेल.
  • ही चिप एका खास चष्म्यासोबत जोडून सर्वोत्तम व्हिज्युअल डेटा दाखवण्यास मदत होईल, असा विश्वास न्यूरालिंक इंजिनीअर जोसेफ ओ’डोहर्टी यांनी व्यक्त केला.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;