झेडपी शाळेत प्रवेश घेतला तर घरपट्टीत 50 टक्के सूट, भिवंडी तालुक्यातील भादाणे ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम

झेडपी शाळेत प्रवेश घेतला तर घरपट्टीत 50 टक्के सूट, भिवंडी तालुक्यातील भादाणे ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम

गावात सुरू असलेली मराठी शाळा टिकवण्यासाठी भिवंडी तालुक्यातील भादाणे ग्रामपंचायतीने विशेष उपक्रम सुरू केला आहे. जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत 50 टक्के सूट देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. हा ठराव सरपंच ज्योत्स्ना भालेकर, उपसरपंच मेघा भोईर यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत मंजूर झाला आहे.

ग्रामपंचायत भादाणेमध्ये भादाणे, आतकोली, जूपाडा, चिंबीपाडा शेरेकरपाडा या गावांचा समावेश आहे. ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेचे भवितव्य टिकविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शाळेची ओढ निर्माण व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. गावकऱ्यांमध्ये शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण हाही या निर्णयामागचा उद्देश आहे, अशी माहिती सरपंच ज्योत्स्ना भालेकर यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या पाल्च्याच्या पालकांना घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय मासिक सभेत घेण्यात आला आहे.

वृक्षारोपण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सवलत
इयत्ता पहिली ते चौथीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी पाच रोपे दिली जाणार आहेत. त्यातील सर्व झाडे जगवून झाडांची वाढ चांगल्याप्रकारे झालेल्या संबंधित पाल्यांच्या पालकांना पुढील वर्षात घरपट्टी व पाणीपट्टी करामध्ये 50 टक्के सूट देण्यात येणार आहे, असेही ग्रामसेवक एम. बी. जाधव यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;