Breaking- बॉम्बच्या धमकीनंतर Indigo च्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

Breaking- बॉम्बच्या धमकीनंतर Indigo च्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

विमानात बॉम्बच्या धमकीची आणखी एक घटना समोर आली आहे. इंडिगोचे विमान कोचीहून दिल्लीला जात होते. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर हे विमान नागपुरात उतरवण्यात आले आहे.

विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर, विमान नागपुरात उतरवण्यात आले. सध्या या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या विमानतळावर पोहोचल्या आहेत आणि विमानाची तपासणी केली जात आहे. इंडिगोचे हे विमान वीस मिनिटांपूर्वी नागपूर विमानतळावर उतरले होते. परंतु अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

आज सकाळी 9.20 वाजता बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर इंडिगोच्या विमान क्रमांक 6E- 2706 ला नागपूर विमानतळावर वळवण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;