युद्धग्रस्त इराणमधून निघालेले 110 हिंदुस्थानी आर्मेनिया सीमेवर दाखल

युद्धग्रस्त इराणमधून निघालेले 110 हिंदुस्थानी आर्मेनिया सीमेवर दाखल

इराण आणि इस्रायल या दोन्ही देशातील युद्ध संघर्ष आता चांगलाच पेटलेला आहे. दोन्ही देश सतत एकमेकांवर  क्षेपणास्त्रांनी हल्ला करत आहेत. तेल अवीव, हैफा आणि पेटाह टिक्वा येथे इराणी हल्ल्यात अनेक लोक ठार आणि डझनभर जखमी झाले आहेत. इस्रायल-इराण संघर्षांचा मंगळवार (17 जून) हा पाचवा दिवस आहे. सोमवारच्या मध्यरात्री दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागली. दरम्यान, हिंदुस्थानने इराणमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मिशन रेस्क्यू सुरू केले आहे.

इराणच्या सरकारी मीडिया कार्यालयावरील हल्ल्यानंतर, अँकर सहर इमामी बुलेटिन देण्यासाठी परतली! इस्त्रायलला सुनावले खडे बोल

110 हिंदुस्थानींचा पहिला गट इराणमधून आर्मेनियाला पोहोचला आहे, तेथून या सर्व लोकांना हिंदुस्थानात परत आणले जाईल. याशिवाय हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराण आणि इस्रायलमध्ये राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. यापूर्वी, कॅनडामध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या नेत्यांनी मध्य पूर्व संकटावर चिंता व्यक्त करणारे संयुक्त निवेदन जारी केले आहे.

G7 नेत्यांनी इराणबाबत तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे आणि इस्रायलला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. निवेदनात असेही म्हटले आहे की G7 देशांची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे की इराण कधीही अण्वस्त्रे मिळवू शकत नाही. याशिवाय, G7 नेत्यांनी या प्रदेशात शांतता आणि स्थिरता राखण्याची गरज यावर भर दिला.

त्याच वेळी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दावा केला की इराणने अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की क्षेपणास्त्र त्यांच्या बेडरूमच्या खिडकीवर आदळले. त्यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाला लक्ष्य करत राहण्याची शपथ घेतली आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी राष्ट्रीय एकतेचे आवाहन केले. त्याच वेळी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी यांनी इस्रायलवर निवासी भागात हल्ला केल्याचा आरोप केला आहे आणि हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर देऊ अशी धमकी दिली आहे. इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी इशारा दिला आहे की तेहरानला लवकरच याची किंमत चुकवावी लागेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;