कोणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही, शरद पवार यांची स्पष्ट भूमिका

कोणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही, शरद पवार यांची स्पष्ट भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमात भाजपला फैलावर घेतलं. तसेच भाजपशी हातमिळवणी करणाऱ्यांचाही शरद पवार यांनी समाचार घेतला. भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेऊ शकत नाही, असे शरद पवार म्हणाले.

गांधी, नेहरू, चव्हाण, फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांचे असेल त्यांना सोबत घेऊ. पण सत्तेसाठी भाजप बरोबर जाऊन बसायचं ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाही. त्यामुळे कोणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही. अशा पद्धतीने संधीसाधूपणाचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही. त्या दृष्टीकोणातून पावलं ही आपल्याला टाकायची आहेत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

‘नागरी उड्डाण’च्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळे यांची मागणी

जे गेले त्यांची चिंता करू नका. मी असे अनेक प्रसंग पाहिले आहेत. माझ्यासोबतच्या अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली. पण ज्या-ज्यावेळी असं घडलं तेव्हा मी चिंताग्रस्त झालो नाही. मला कार्यकर्त्यांनी खंबीर साथ दिली आणि जनतेने पाठिंबा दिला. त्यानंतरही मी सत्तेत आलेलो आहे. त्यामुळे कोण आला, कोण गेला याची चिंता करू नका. लोक शहाणे आहेत, आज ही लोकशाही जनतेच्या शहाणपणाने टिकलेली आहे. ती यापुढेही टिकून राहणार आहे, असे शरद पवार म्हणाले.

पिंपरी-चिंचवडमध्ये भगवा फडकावण्यासाठी सज्ज व्हा; सचिन अहिर यांचे आवाहन

निवडणुकीची काळजी करू नका. आपल्यासोबत जो येणार असेल, ते आपल्या विचारांशी जोडून राहणार असतील तर त्यांचा विचार वरिष्ठ करतील. मी तुम्हाला विश्वास देतो. आगामी महापालिका निवडणुकीबाबत तुम्ही चिंताच करू नका, असे सांगत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;