Israel-Iran Conflict : इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला; 8 ठार, 300 जखमी

Israel-Iran Conflict : इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला; 8 ठार, 300 जखमी

इराण-इस्रायल संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. सलग चार दिवस हवाई हल्ले करणाऱया इस्रायलला जबरदस्त प्रत्युत्तर देताना सोमवारी इराणने सर्वात मोठा हल्ला केला. इराणच्या सैन्याने मध्य इस्रायलमध्ये अनेक ठिकाणी बॅलिस्टिक क्षेपणास्रे डागली. या हल्ल्यात इस्रायलमधील 8 जण ठार, तर 300 हून अधिक जखमी झाले. इराणने आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केल्याने आखातात युद्धाचा मोठा भडका उडण्याची चिन्हे आहेत.

इस्रायलने चार दिवस इराणवर हल्ले सुरू ठेवले. संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयावर हल्ला करण्यासह लष्करी छावण्या, अणुकेंद्रे उद्ध्वस्त केली. त्यात इराणचे मोठे नुकसान झाले. चार दिवसांत तब्बल 224 लोकांचा मृत्यू, तर 1227 लोक जखमी झाले. याचा जबरदस्त बदला घेत इराणने सोमवारी भल्या पहाटे मध्य इस्रायलच्या विविध शहरांतील महत्त्वाच्या पाच ठिकाणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. यात इस्रायलचे आठ नागरिक ठार झाले आणि 300 हून अधिक नागरिक जखमी झाले. इस्रायलच्या हल्ल्यांना जबरदस्त उत्तर देण्यासाठी इराणने सोमवारी सर्वात मोठा हल्ला केल्याने संघर्ष तीव्र झाला आहे.

सरकारी न्यूज चॅनेलवर हल्ला, अँकर थोडक्यात बचावली

इराणच्या जबरदस्त हल्ल्यानंतर इस्रायलने पुन्हा हवाई हल्ले केले. सोमवारी सायंकाळी पुन्हा मध्य इराणवर हवाई हल्ले करण्यात आले. इराणची राजधानी तेहरानमधील राष्ट्रीय टीव्ही न्यूज चॅनेल इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंगच्या इमारतीवर बॉम्ब टाकण्यात आला. ही घटना घडली त्यावेळी टीव्ही अँकर लाइव्ह शोचे आयोजन करीत होती. बॉम्बस्पह्टातून ती थोडक्यात बचावली. घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सकाळपासून तेहरानच्या दिशेने जाणाऱया आणि क्षेपणास्त्र लाँचर्सने भरलेल्या अनेक ट्रकवर निशाणा साधण्यात आला आहे, असे इस्रायली हवाई दलाने म्हटले.

तेहरानच्या हवाई क्षेत्रावर नियंत्रण मिळवल्याचा दावा

इराणने हल्ला करताच इस्रायलने मोठमोठे दावे करण्यास सुरुवात केली. इस्रायल विजयाच्या मार्गावर पोहोचला आहे. तेहरानच्या हवाई क्षेत्रावर आम्ही नियंत्रण मिळवले आहे, असा दावा पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी सोमवारी केला. त्यांनी संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ आणि चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट-जनरल इयाल झमीर यांच्यासमवेत मध्य इस्रायलमधील टेल नोफ एअरबेसला दिलेल्या भेटीदरम्यान हे मोठे विधान केले.

गाझामध्येही नरसंहार; इस्रायलच्या हल्ल्यात 38 पॅलेस्टिनी ठार

इस्रायलने सोमवारी गाझामध्ये नरसंहार केला. तेथील मदत केंद्रावर निशाणा साधून केलेल्या मोठय़ा हल्ल्यात तब्बल 38 पॅलेस्टिनी ठार झाल्याचे वृत्त आहे. गाझाच्या दक्षिण भागात अन्न वितरण केंद्रांच्या परिसरात गोळीबार झाला. त्यात 38 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. मदत केंद्रांभोवती रोज होणाऱया गोळीबाराच्या घटनेतील ही सर्वात मोठी घटना होती, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने माहिती देताना नमूद केले.

हातात हात घालून लढावे लागेल इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा संदेश

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पाझ्श्कियान यांनी सरकारी टीव्हीवरून देशाला संबोधित केले. मनोबल ढळू देऊ नका. या लढय़ात एक शहीद झाला तर शेकडो देशवासी उभे ठाकतील. ते देशाचा ध्वज फडकवत ठेवतील. इस्रायलचे संकट रोखण्यासाठी प्रत्येक देशवासीयाला हातात हात घालून उभे ठाकावे लागेल, लढावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

इराणमध्ये 10 हजार हिंदुस्थानी अडकले

युद्धाच्या स्थितीमुळे इराणमधील सर्व विमानतळ बंद करण्यात आले आहेत. त्याच वेळी देशाच्या सीमा खुल्या करण्यात आल्या असून ज्या परदेशी नागरिकांना देश सोडायचा आहे ते जाऊ शकतात, असे सांगण्यात आले आहे. इराणमध्ये सुमारे 10 हजार हिंदुस्थानी अडकले आहेत. त्यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून या सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम हिंदुस्थानी दूतावासाने सुरू केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल