सोन्याने पुन्हा उच्चांकापर्यंत मजल मारली अन् घसरगुंडी झाली; जाणून घ्या आजचे दर…

सोन्याने पुन्हा उच्चांकापर्यंत मजल मारली अन् घसरगुंडी झाली; जाणून घ्या आजचे दर…

इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्यातील गुंतवणुकीकडे वळल्याने सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आणि सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उच्चांक गाठला. मात्र, त्यानंतर सोन्याच्या दरात घसरणीला सुरुवात झाली. गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या किमतींनी नवे विक्रम रचले. मात्र, सोमवारी नवीन उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या किमती अचानक घसरल्या आणि प्रति 10 ग्रॅमसाठी किंमती 1400 रुपयांनी कमी झाल्या.

गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. इस्रायल-इराण युद्धाची तीव्रता वाढत असताना सोन्याने नवे उच्चांक गाठण्यास सुरुवात केली. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 1,01,078 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन विक्रमी पातळीवर पोहोचला. मात्र, त्यानंतर त्यात घट झाली आणि तो 1400 रुपयांनी घसरला.

सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX गोल्ड रेट) सोन्याच्या किमतीत तेजी दिसून आली आणि 5 ऑगस्ट रोजी संपणाऱ्या सोन्याचा फ्युचर्स भाव 1,01,078 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला, जो त्याचा आतापर्यंतचा उच्चांक आहे. यानंतर, सोन्याच्या किमतीत घसरण सुरू झाली आणि किंमती वेगाने घसरल्या. MCX वर सोन्याचा भाव 1.42 टक्के किंवा 1426 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरून 98,850 रुपये प्रति 10 ग्रॅम झाल्या.

सराफा बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 99,370 रुपये होता. तर 22 कॅरेट सोने 96,990 रुपये प्रति 10 ग्रॅम, 20 कॅरेट सोने 88,440 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने 80,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोन्याचा दर 64,100 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;