बाहेर पडता येईल त्यांनी तातडीने बाहेर पडा; तेहरानमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानींना दुतावासाचे आवाहन

बाहेर पडता येईल त्यांनी तातडीने बाहेर पडा; तेहरानमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानींना दुतावासाचे आवाहन

इस्रायल आणि इराणमधील युद्ध आता तीव्र झाले आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी दूतावासाने इराणमध्ये राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. बाहेर पडता येईल त्यांनी तातडीने बाहेर पडा असे आवाहन तेहरानमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानींना दुतावासाने केले आहे. तातडीने तेहरामधून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असा सल्ला दुतावासाने दिला आहे.

इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे इराणमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळे मंगळवारी भारतीय दूतावासाने हिंदुस्थानी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. तेहरानमधील सर्व हिंदुस्थानी नागरिकांनी तेहरान शहराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. बाहेर पडता येईल, त्यांनी तातडीने शहराबाहेर पडावे, असा सल्ला दुतावासाने दिला आहे.

युद्धग्रस्त इराणमधून निघालेले 110 हिंदुस्थानी आर्मेनिया सीमेवर दाखल

तेहरानमधील जे हिंदुस्थानी अद्याप आमच्याशी संपर्क साधू शकले नाहीत त्यांनी त्वरित आमच्याशी संपर्क साधावा. सध्या इराणमध्ये 10,765 हिंदुस्थानी नागरिक राहतात. तेहरानमधील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना दूतावासाने शहरातून बाहेर काढले आहे. तसेच इतर हिंदुस्थानी नागरिकांनाही तातडीने शहर सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काही हिंदुस्थानींना आर्मेनियाच्या सीमेवरून इराण सोडण्याची सुविधा देण्यात आली आहे. अडकलेल्या नागरिकांनी सर्व शक्य मदत करण्यासाठी दूतावास सतत लोकांच्या संपर्कात आहे. तेहरानमध्ये असलेल्या आणि दूतावासाच्या संपर्कात नसलेल्या सर्व भारतीय नागरिकांना तेहरानमधील भारतीय दूतावासाशी त्वरित संपर्क साधून त्यांचे स्थान आणि संपर्क क्रमांक देण्याची विनंती केली आहे. यासोबतच, दूतावासाने हेल्पलाइन नंबर देखील शेअर केले आहेत. +989010144557; +989128109115; +989128109109 याशिवाय, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, इस्रायल आणि इराण दोन्ही ठिकाणी 24×7 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर दूतावासाने हिंदुस्थानी नागरिकांना तेहरान सोडण्याचा सल्ला दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;