जेव्हा कसोटी डावाने जिंकतो तेव्हा विकेट किती गेल्या हे महत्त्वाचं नसतं! ‘ऑपरेशन सिंदूर’वरून सीडीएस अनिल चौहान यांची फटकेबाजी

जेव्हा कसोटी डावाने जिंकतो तेव्हा विकेट किती गेल्या हे महत्त्वाचं नसतं! ‘ऑपरेशन सिंदूर’वरून सीडीएस अनिल चौहान यांची फटकेबाजी

मला जेव्हा विचारलं जातं की किती नुकसान झालं, तेव्हा मी म्हणतो ते महत्त्वाचं नाही. निकाल महत्त्वाचा आहे. तुम्ही कसा प्रतिसाद देता हे महत्त्वाचे आहे. नुकसानासंदर्भात बोलणे योग्य होणार नाही. जेव्हा तुम्ही क्रिकेट कसोटी मॅच डावानं जिंकता तेव्हा किती विकेट गेल्या हे महत्त्वाचे नसते, असे महत्त्वपूर्ण विधान चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी आज केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र्ा या विभागातर्फे ‘फ्युचर वॉर्स अॅण्ड वॉरफेअर’ या विषयावर सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. चारूशीला गायके आदी उपस्थित होते.

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी हिंदुस्थानचे किती नुकसान झाले, यासंदर्भात भाष्य करताना सीडीएस अनिल चौहान यांनी क्रिकेट कसोटी मॅचचे आणि फुटबॉलचे उदाहरण दिले. जेव्हा तुम्ही कसोटी क्रिकेट मॅच खेळत असता आणि डावाने जिंकता तेव्हा किती विकेट गेल्या, किती बॉल आणि किती फलंदाज बाद झाले हे महत्त्वाचे नसते. फुटबॉल सामन्यात एका संघाने तीन विरुद्ध दोन गोलने विजय मिळविला तर त्या संघाचा विजय महत्वाचा असतो, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

पाकिस्तानला 8 तासांत गुडघे टेकवायला लावले

पाकिस्तानने ज्या लष्करी कारवाईसाठी 48 तास सांगितले होते ती मोहीम त्यांनी अवघ्या आठ तासांतच आटोपती घेतली. पाकिस्तानने युद्ध विरामाची भाषा केली. पाकिस्तानने हिंदुस्थानच्या डीजीएमओशी पह्न करून चर्चा केली. अवघ्या आठ तासांत पाकिस्तानला गुडघे टेकवायला लावले, अशी माहिती सीडीएस चौहान यांनी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;