सदस्यता शुल्क वाढवल्याने डब्ल्यूएचओवर टीका

सदस्यता शुल्क वाढवल्याने डब्ल्यूएचओवर टीका

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अनिवार्य सदस्यता शुल्क वाढीला मंजुरी दिल्याने मोठय़ा प्रमाणावर टीका होत आहे. या वाढीमुळे जगभरातील करदात्यांकडून दर वर्षी थेट 120 दशलक्ष डॉलर्स जास्त वसूल करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर कन्झ्युमर चॉइस सेंटरने ही संघटना खरोखर आर्थिक मदत मिळवण्यास पात्र आहे का, असा खडा सवाल केला आहे. तसेच पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि निधीवाटपाबाबत महत्त्वपूर्ण प्रश्नही उभे केले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच आपल्या अनिवार्य सदस्यता शुल्कात (ज्याला मूल्यांकन केलेले योगदान म्हणून ओळखले जाते) 20 टक्के वाढीची घोषणा केली आहे. 2026 आणि 2027 साठी हे दर अतिरिक्त 120 मिलियन डॉलरवर जाणार आहेत. ज्याचा फटका थेट जगभरातील करदात्यांना बसणार आहे. हिंदुस्थानसारख्या देशात आरोग्यावर होणाऱ्या खर्चाच्या 60 टक्केपेक्षा जास्त भाग लोक स्वतः खर्च करतात. तसेच सार्वजनिक आरोग्य प्रणालींमध्ये निधीची कमतरता असते. अशावेळी जागतिक आरोग्य संघटनेच्या खर्चाच्या निर्णयावरून जोरदार टीका सुरू झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;