विद्यार्थ्यांनी अनुभवली विज्ञानाची अद्भुत दुनिया;  युवासेनेने मुलांना घडवली नेहरू विज्ञान केंद्राची सहल

विद्यार्थ्यांनी अनुभवली विज्ञानाची अद्भुत दुनिया;  युवासेनेने मुलांना घडवली नेहरू विज्ञान केंद्राची सहल

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विज्ञानाच्या माध्यमातून सोप्या भाषेत सांगण्यासाठी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रात शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. युवासेना सहसचिव प्रथमेश बोभाटे व युवासेना शाखा अधिकारी नितीन शिरोडकर यांच्या वतीने प्रभाग 198 मधील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी ही शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती.

वैज्ञानिक शैक्षणिक सहलीच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या गूढ, रोचक आणि प्रेरणादायी जगाची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. त्यांच्या जिज्ञासेला चालना देणारा, नवकल्पनांना प्रोत्साहन देणारा आणि विज्ञानाभिमुख दृष्टिकोन विकसित करणारा अनुभव लाभला. विज्ञान प्रदर्शन, प्रयोगशाळा, तंत्रज्ञान गॅलरी व सायन्स शो यांमधून मुलांनी नव्या ज्ञानाची ओळख करून घेतली आणि त्यांच्या ज्ञानात भर पडली. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल आत्मीयता निर्माण करणारा, अभ्यासाची गोडी वाढवणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला दिशा देण्यास हा उपक्रम यशस्वी ठरला. या उपक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये शिवसेना आमदार सुनील शिंदे, उपनेत्या किशोरी पेडणेकर, भारतीय विमा सेना सरचिटणीस दिनेश बोभाटे, भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम, उपविभागप्रमुख राम साळगावकर, वरळी विधानसभा संघटक निरंजन नलावडे, सामाजिक कार्यकर्ते बाळाशेठ खोपडे, विधानसभा संघटक अनुपमा परब, शाखाप्रमुख दीपक बागवे, शाखा संघटक शारदा पापण, यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;