अंधेरी पश्चिम, वेसावेत 11 तास पाणीपुरवठा बंद; पालिका जलवाहिनीवरील झडप बदलणार

अंधेरी पश्चिम, वेसावेत 11 तास पाणीपुरवठा बंद; पालिका जलवाहिनीवरील झडप बदलणार

अंधेरी (पश्चिम) येथील गोपाळकृष्ण गोखले पुलाखालील वांद्रे जलवाहिनीवरील 1,350 मिलीमीटर व्यासाची प्रवाह नियंत्रण झडप दुरुस्ती आणि वेसावे जलवाहिनीवरील 900 मिलीमीटर व्यासाची फुलपाखरू झडप बदलण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरुवार, 19 जूनला दुपारी 2 वाजेपासून शुक्रवार, 20 जून मध्यरात्री 1 वाजेपर्यंत एकूण 11 तास महापालिकेच्या के-पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. या कामादरम्यान संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा 11 तास बंद करावा लागणार आहे. त्यामुळे के पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या भागात पाणी नाही  

zपार्ले पश्चिम – लल्लूभाई उद्यान, लोहियानगर, पार्ले गावठाण, मीलन भूयारी मार्ग (सबवे), जुहू विलेपार्ले विकास योजना (जेव्हीपीडी स्कीम), जुहू गावठाण क्रमांक 03, व्ही. एम. मार्ग, विलेपार्ले (पश्चिम)

z मोरागाव (जे. व्ही. पी. डी.) – मोरागाव, जुहू गावठाण क्रमांक 1 आणि 2, विलेपार्ले (पश्चिम)

z गिलबर्ट हिल, अंधेरी (पश्चिम) – जुहू गल्ली, धनगरवाडी, सागर सिटी सोसायटी, अंधेरी (पश्चिम)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;