काल म्हणाले, चूक झाली; आज श्रेय शिवराजसिंहांना; लाडकी बहीण योजना, अजित पवारांचे उल्टा पुल्टा

काल म्हणाले, चूक झाली; आज श्रेय शिवराजसिंहांना; लाडकी बहीण योजना, अजित पवारांचे उल्टा पुल्टा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आमची चूक झाली असे जाहीरपणे सांगणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चक्क पलटी मारली. मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांनी सुरू केलेल्या ‘लाडली बहन’ योजनेने आम्हाला प्रेरणा दिली आणि त्याच वाटेवरून आम्ही महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली. यामुळे 236 आमचे उमेदवार विजयी झाले, असे थेट सांगून टाकले.

कृषी महाविद्यालयातील पहिल्या अँग्री हॅकेथॉन स्पर्धेच्या समारोपप्रसंगी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बोलताना अजित पवार यांनी ही भूमिका मांडली. पवार म्हणाले, ‘या योजनेमुळे महिलांनी भरभरून प्रेम दिले. आमच्या मतपेट्या मतांनी भरभरून वाहिल्या. परिणामी, विधानसभेच्या 288 जागांपैकी तब्बल 236 जागांवर आमचे उमेदवार विजयी झाले. हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक विजय आहे. राज्यात महायुतीचे एक बळकट सरकार स्थापन झाले आहे.’

शिवराजसिंह चौहान यांचे विशेष आभार मानत ते म्हणाले, तुम्ही आम्हाला मतदारांची मने जिंकण्याचा मार्ग दाखवला. आम्ही तुमच्या पावलावर पाऊल ठेवून ही योजना राबवली आणि त्यातून मतदारांचा विश्वास मिळविला. त्यामुळेच हे यश शक्य झाले.

चौहान म्हणाले, ‘हीयोजना माझी नाही, ती तुमचीच आहे. मध्य प्रदेशात लाडकी लक्ष्मीपासून लाडकी बहीणपर्यंतचा प्रवास महिला सशक्तीकरणाचा आहे. मात्र, महाराष्ट्राने केलेल्या अनेक कामांचा अवलंब अन्य राज्ये करत आहेत. दुसऱ्यांकडील एखादे काम चांगले असल्यास महाराष्ट्रात अवलंब केला जातो.’

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;