मुंबई गिळण्यासाठीच अमित शहा यांनी निवडणूक आयोगावर दबाव टाकत मिंधे गट बनवला – संजय राऊत

मुंबई गिळण्यासाठीच अमित शहा यांनी निवडणूक आयोगावर दबाव टाकत मिंधे गट बनवला – संजय राऊत

शिवसेनेचा मेळावा जोरात आणि जोशात होणार आहे. प्रामाणिकपणा आणि निष्ठा हीच आमची ताकद आहे. मिंधे जे करत आहे ती सत्ता आणि भ्रष्टाचारातून आलेल्या पैशांची ताकद आहे. मुंबई गिळण्यासाठी अमिश शहा यांनी निवडणूक आयोगावर दबाव टाकत मिंधे गट स्थापन केला आणि शहा यांच्या जाळ्यात मिंधे फसले, असे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे आणि भाजपला चांगलेच फटकारले.

मिंधे यांचा पक्ष नसून तो गट आहे. त्या गटाचे अध्यक्ष अमित शहा आहेत. निवडणूक आय़ोगावर दबाव टाकून अमित शहा यांनी हा गट स्थापन केला. महाराष्ट्र आणि मराठी माणूस कमजोर करण्यासाठी, मुंबई गिळण्यासाठी त्यांनी हा गट स्थापन केला. त्याला मिंधे बळी पडले. त्यांचा एक गट आहे. भ्रष्टाचारातून आलेला प्रंचड बेहिशोबी पैसा आहे. एमएमआरडीएच्या कंत्राटात 3 हजार कोटींचा घोटाळा सर्वोच्च न्यायालयानेच उघड केला आहे. एका टेंडरमध्ये तीन हजार कोटी याप्रमाणे महिन्याला एमएमआरडीएची 119 मोठी टेंडर निघतात. किती कोटींचा व्यवहार असतो. त्यातून मिळालेले पैसे राजकारणात आणतात. आमदार, खासदार विकत घेण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी, मतं विकत घेण्यासाठी त्याचा वापर करतात. त्यामुळे ते जे करतात, ती पैशांची आणि सत्तेची ताकद आहे. आमची ताकद ही प्रामणिकपणा आणि निष्ठा आहे. त्यामुळे शिवसेनेचा वर्धापनदिनाचा मेळावा हा जोरात आणि जोशात होणार आहे. तसेच हा मोळावा विशेष असणार आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी त्यांचा मुलगा गमावला आहे. अशा परिस्थितीतही मिंधे आणि भाजप घोसाळकर यांच्या कुटुंबावर दबाव टाकत आहेत. त्यांच्या सुनेला पक्षात येण्यासाठी सांगत आहेत. अशा परिस्थितीत घोसाळकर कुटुंबावर दबाव टाकत राजकारण करणाऱ्या मिंधे आणि भाजपला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी फटकारले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;