नाशिकमधील शिवसेना खंबीर, मजबूत आणि अभेद्य; संजय राऊत यांनी केलं स्पष्ट

नाशिकमधील शिवसेना खंबीर, मजबूत आणि अभेद्य; संजय राऊत यांनी केलं स्पष्ट

नाशिकमधील काही जण पक्ष सोडून जात असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, त्या चर्चा म्हणजे हवेतील पंतगबाजी आहे. पक्षासाठी अडचणीचे ठरणाऱ्यांना पक्षातून दूर करण्यात आले आहे. तसेच निशाकमधील शिवसेना नेते, पदाधिकारी पक्षआसोबतच आहे. नाशिकमधील शिवसेना खंबीर, मजबूत आणि अभेद्य असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

सुधाकर बडगुजर आमच्या पक्षात होते, आमच्या पक्षातून त्यांना दूर केले, आता ते कोणत्याही पक्षात जाऊ दे, त्याबाबत काहीही चर्चा होऊ दे, ते आता आमच्या पक्षात नाही, त्यामुळे हा विषय आमच्यासाठी संपला आहे. तसेच काही नगरसेवक पक्ष सोडत असल्याच्या चर्चेबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, नाशिकमधील शिवसेना खंबीर, मजबूत आणि अभेद्य आहे, असे ते म्हणाले.

ज्यांना जायचे होते, ते गेले आणि ज्यांना पक्षातून दूर करायचे होते, त्यांना दूर केले. आता फक्त नावे येत आहेत, चर्चा सुरू आहेत, ही फक्त हवेतील पंतगबाजी आहे. पक्षाला अडचणीचे ठरणाऱ्या माणसांना पक्षापासून दूर करण्यात आले आहे. नाशिकमधील शिवसेना मजबूत असून सर्व पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. या हवेतील चर्चांना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. बबनराव घोलप सध्या फिरता रंगमंच आहेत. त्यांचे पुत्र योगेश घोलप पक्षाचे उमेदवार होते. त्यांच्यासाठी संघर्ष करून आम्ही जागा मिळवली होती.ज्या नावांची चर्चा होत आहेत, त्यांनी आपल्याला संपर्क साधून आपण पक्षासोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चर्चांना काहीही अर्थ नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;